Adventure Activities

साहसीक शिबीरे:
युवंकाच्या सुप्तगुणांना वाव देण्यासोबतच त्यांच्या व्यक्तीमत्व विकासात भर पडावी म्हणून साहस शिबीराचे आयोजन केले जाते. या माध्यमांतून युवकांमध्ये शौर्य निर्माण होउन राष्ट्रीय कार्यात हातभार देण्याचा प्रयत्न होत आहे . यात पर्वतारोहण, गिर्यारोहण, जंगलभ्रमण, पॅराग्लायडींग, वॉटरफॉल रॅपलीग आदी प्रकारची साहसीक शिबीरे आयोजीत केली जातात.

निसर्ग शिबीरे:

चंद्रपूर जिल्हयात निसर्गाने सौदर्याची मुक्तकंठाने उधळण केली आहे. ताडोबा, जुनोना, माणीकगड, सोमनाथ, घोडाझरी, रामदेगी आदी स्थळ म्हणजे सौदर्याची खाणच. येथे वन्यप्राणी, पक्षी, ऐतीहासीक व प्राची गुफांनी नटल्या आहेत. या निसर्गाबदद्ल नव्या पिढयांमध्ये आत्मियता वाढून प्रेम निर्माण व्हावे यासाठी इको-प्रो संस्थेच्या वतीने निसर्ग शिबारांचे आयोजन केले जाते. पक्षी-प्राण्यांची ओळख, झाडांची माहीती जंगलातील जैवविवीधतेचे महत्व या शिबीरातुन शालेय विद्याथ्र्याना तसेच नागरीकांना सांगीतले जाते.