प्राणी जीवनातील ‘साप’ हा प्राणी शेतीसाठी सतत उपयुक्त ठरत असलेला आहे. सापांच्या अनेक प्रजातीपैकी फार थोडया विषारी असतात. अधिकतर साप हे बिनविषारीच असतात. पण सापाबद्यलच्या सार्वत्रीक भितीमुळे सपा विनाकारण मारले जातात, हे निर्विवाद सत्य आहे. तेव्हा समाजाच्या सर्व स्तरात सापासंबंधीचा खरा आणि वैज्ञानीक दृष्टीकोन जागविणे ही काळाची गरज ठरली आहे. ‘इको-प्रो’ संस्थेच्या सर्पमित्र विभागानी याबाबतीतही बांधीलकी स्विकारली आहे. आमच्या ‘सर्पमित्रां’ च्या मदतीने आम्ही हे काम करीत आहोत. गारूडयाकडुन साप मुक्त करणे, सर्पविषयक जाणीव जागृ तीसाठी वर्ग घेणे, लोकांकडे निघणाऱ्या सापांना पकडणे व साप पकडण्याचे प्रशिक्षण युवा-युवंतीना देणे, पकडलेल्या सापांना वनविभागांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा जंगलात सोडणे इत्यादी जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळण्याच्या प्रामाणीक प्रयत्न सर्पमित्र संस्था करीत आहे. तसेच सर्पदंश झाल्यानंतर गाव-खेडयात डॉक्टरी उपचारापेक्षा मांत्रीकावर जास्त विश्वास असतो त्यामुळे दरवर्षी शेकडो लोकांचा बळी जातो. अशा गावातील अंधश्रघ्दा दूर करण्याचे काम संस्था करते . अशा मांत्रीकांचा भांडाफोड करणे आणि लोकांचे प्राण वाचविण्याचे महत्वपुर्ण कार्यात संस्था अग्रेसर आहे.
अ. साप रेस्क्यु करणे
ब. प्रबोधन कार्यक्रम
क. प्रशिक्षण कार्यक्रम