Environment Conservation

जिवनाच्या जवळजवळ सर्वच क्षेत्रात होणाऱ्या प्रचंड प्रदुषणामुळे संपुर्ण पर्यावरणालाच धोका निर्माण झालेला दिसतो. परिणामी मानवी अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. अन् त्याचे परिणाम माणुस भेगतो आहे. मानवी प्रगतीच्या सोसापोटी केल्या जाणाऱ्या नानाविध प्रयोगामुळे प्रदुषणात भर पडते आहे, आणि पर्यावरणाचे असंतुलन वाढू लागले आहे. म्हणूनच पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे. त्याचे महत्व आणी त्यासंदर्भात समाजाने कृतीशिलता अंगिकारण्याची आज गरज आहे.

हे उद्दिष्ट समोर ठेवूनच ‘इको-प्रो’ संस्थेने या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. पर्यावरण शिक्षण देणे व त्याबाबतीत सक्रीय सहभाग नांदवणे ही आम्ही आमची जबाब दारी मानतो . पर्यावरण संरक्षणसाठी व सुधारण्यासाठी आवश्यक ते ज्ञान, मुल्ये, अभिवृत्ती, बांधलकी व कौशल्ये प्राप्त करण्याची संधी प्रत्येकाला उपलब्ध करून देणे हा आमचा हेतु आहे . पर्यावरणाच बाबतीत वर्तनाचे नवीन धडे घालणाऱ्या व्यक्ती, समुह व समाज निर्माण करणे आणि त्याव्दारे महत्वाचा उद्देश आहे . यादृष्टीने निरनिराळे उपक्रम आम्ही राबवित असतो.