तिन्ही बाजुंनी चंद्रपूर शहर नदयांनी वेढलेले आहे. त्यामुळे दरवर्षी निर्माण होणाऱ्या पुर परिस्थितीचा सामना चंद्रपूर शहराला करावा लागतो. यातून जिवीत व मालमत्तेची हानी मोठया प्रमाणावर तर होतेच पण अस्वच्छता, रोगराई व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. एवढेच नव्हे तर औदयोगीक प्रतिष्ठानात होणारे स्फोट, अपघात, शहरात लागणाऱ्या आगी, को ळसा खाणीमुळे कधीकधी उदभ्वणारी भुकंपसदृष परिस्थिती यांचा सामना शहराला करावा लागतो. अशा प्रसंगी प्रशासन आपल्या परने प्रयत्न करीत असते. पण कधी हे प्रयत्न अपुरे असतात तर कधी अतिशय संथपणे चालले असतात. या यप्रयत्नांना गतीप्रवण करण्यासाठी आणि शासनाला आपल्या परीने मदतीचा हात देण्यासाठी ‘इको-प्रो’ ने सहकार्य केलेले आहे. सर्वसामान्य जनतेच्या बंधूभावात्मक सहकार्यावरच नगर संरक्षक दलाच्या कार्याची भक्कम इमारत उभी राहील असा ‘इको-प्रो’ला विश्वास वाटतो .
अ. पुरपिडीत भागात व्यवस्थापन
ब. नागरीकांचे प्रबोधन
क. कार्यकर्त्यांना प्रशिक्षण