जलपुनर्भरण करिता शहरातील सर्व बोरवेलला ही यंत्रणा तयार करण्यात येईल – आयुक्त काकड़े इको-प्रो च्या प्रयत्नाची आयुक्ताकडून पाहणी इको-प्रो चे ‘रेनवाटर-वेस्ट वाटर हार्वेस्टिंग’ संकल्प वर्ष – महानगरपालिका सोबत करणार जनजागृती चंद्रपूर : शहरातील सार्वजनिक बोरवेल ला जलपुनर्भरण यंत्रणा उभारण्याकरिता इको-प्रो तर्फे तयार करण्यात आलेल्या बोरवेल च्या यंत्रणेची ची पाहणी आज महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांनी भेट देत केली. मागील वर्षी 5 जून 2018 पासून इको-प्रो ने रेनवाटर हार्वेस्टिंग जनजागृती व संकल्प अभियान सुरु केले होते. महानगरपालिका व इको यावर संयुक्तपणे कार्य करित आहे. यासोबत