हेरीटेज वॉक

किल्ला पर्यटनाला वाढता प्रतिसाद…

इको-प्रोची सोशल मीडियातून हाक, चंद्रपूरकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद… चंद्रपूरः इको-प्रोतर्फे फेसबुक-व्हॉटस्अपच्या माध्यमातून चंद्रपूर किल्ला पर्यटनासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी प्रतिसाद देत भल्या पहाटे उठून किल्ला पर्यटन- हेरीटेज वॉकमध्ये सहभाग घेतला. 17 Jun 2018. मागील 1 मार्च 2017 पासून सुरू असलेल्या चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानाला आज 446 दिवस पूर्ण झाले. किल्ला स्वच्छता अभियान सोबतच दुस-या टप्पाचे काम सुरू झाले आहे. याव्दारे चंद्रपूर किल्ला पर्यटनास चालना देण्यासाठी ‘हेरीटेज वॉक’ सारख्या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली असून, याला नागरीकांचा उत्तम प्रतीसाद मिळत आहे.