जलपुनर्भरण करिता शहरातील सर्व बोरवेलला ही यंत्रणा तयार करण्यात येईल – आयुक्त काकड़े इको-प्रो च्या प्रयत्नाची आयुक्ताकडून पाहणी इको-प्रो चे ‘रेनवाटर-वेस्ट वाटर हार्वेस्टिंग’ संकल्प वर्ष – महानगरपालिका सोबत करणार जनजागृती चंद्रपूर : शहरातील सार्वजनिक बोरवेल ला जलपुनर्भरण यंत्रणा उभारण्याकरिता इको-प्रो तर्फे तयार करण्यात आलेल्या बोरवेल च्या यंत्रणेची ची पाहणी आज महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांनी भेट देत केली. मागील वर्षी 5 जून 2018 पासून इको-प्रो ने रेनवाटर हार्वेस्टिंग जनजागृती व संकल्प अभियान सुरु केले होते. महानगरपालिका व इको यावर संयुक्तपणे कार्य करित आहे. यासोबत
उपगंलावार लेआउट मधील नागरीकांचा संकल्प इको-प्रोच्या रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग अभियानास नागरीकांचा सकारात्मक प्रतिसाद चंद्रपूरः इको-प्रो संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग’ जनजागृती अभियानास नागरीकांचा उस्फुर्त प्रतीसाद मिळु लागला आहे.5 जुन ‘जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत इको-प्रो संस्थेच्या वतीने चंद्रपूर शहरात ‘रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग जनजागृती व संकल्प अभियान’ सुरू करण्यात आलेले आहे. या माध्यमाने संस्थेच्या सदस्यांनी संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे व पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके यांच्या मार्गदर्शनात शहरात ठिकठिकाणी फिरून, पब्लीक स्पेस, बागेत, जिल्हा स्टेडीअम येथे पत्रके वाटुन, छोटेखानी बैठका घेत शहरातील
इको-प्रोची मागणी – पालकमंत्री, आमदार व जिल्हाधिकारी यांचेकडे केली मागणी चंद्रपूर- इको-प्रो चे रेनवाॅटर हाॅर्वेस्टींग जनजागृती अभियान सुरू असुन या माध्यमाने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देत सिएसआर फंडातुन सुध्दा नागरीकांना अनुदान देण्याची मागणी करण्यात आलेली आहे.चंद्रपूर शहर हे औदयोगीक शहर आहे, या शहरालगत कोळसा खाणी, विदयुत प्रकल्प, स्टिल उदयोग, एमआयडीसी मधील उदयोग आदी आहेत. उदयोगांचे प्रदुषणामुळे चंद्रपूर शहर देशात प्रदुषणाच्या क्रमवारीत अग्रस्थानी आहे. आता तर सर्वाधीक तापमानाचे शहर म्हणुन सुध्दा देशात नाही तर जगात समोर येउ लागले आहे. अशा स्थितीत चंद्रपुर