ऐतिहासिक चंद्रपूर पर्यटन माहीती केंद्र व संग्रहालय

सदर सराय इमारत संवर्धन करण्यात आल्यास चंद्रपूर शहरात येणाÚया पर्यटकांकरीता शहर तसेच जिल्हातील पर्यटनस्थळांची माहीती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरेल. सदर सराय इमारत बस स्टाॅप, रेल्वे स्टेशन पासुन अगदी जवळ असुन मुख्य रस्त्यावर आहे. ‘काॅफी टेबल बुक’ प्रमाणेच भिंतीवरील डिस्प्ले बोर्ड-फोटोच्या माध्यमातुन ऐतिहासिक वास्तु, मंदीरे, किल्ले, समाध्या याची छायाचित्र माहीतीसह लावण्यात आल्यास चंद्रपूर शहर ओळख व जिल्हयातील पर्यटकांना पाहण्यासारखी स्थळांची माहीती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे सहज शक्य आहे. यामुळे एका ऐतिहासिक इमारतीचे संवर्धन करणे आणी शहरांच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे पाऊल सुध्दा असेल. यात महानगरपालीकेने पुढाकार घेतल्यास चंद्रपूर महानगरपालीकेचे ‘ऐतिहासिक चंद्रपूर पर्यटन माहीती केंद्र’ म्हणुन सुध्दा विकसीत होईल


‘सराय’ इमारतीचे संवर्धन करण्याची इको-प्रो ची पालीका आयुक्तांकडे मागणी

ब्रिटीशकालीन ऐतिहासिक ‘सराय’ इमारतीचे छत पडल्याची घटना मागील सप्ताहात घडली, याकडे वेळीच लक्ष देण्यात न आल्यास हा ऐतिहासिक वारसा नष्ट होईल. सराय इमारतीचे सवंर्धनासाठी इको-प्रोच्या वतीने आज बंडु धोतरे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन सराय इमारतीच्या महत्वाबाबत चर्चा केली व सराय वाचविण्ययासाठी त्वरीत पावले उचलण्याची मागणीचे निवेदन दिले. या दरम्यान मागील वर्षी सराय इमारत स्वच्छता, केंद्रीय सांस्कृतीक मंत्री यांचेकडे झालेली बैठक, जिल्हाधिकारी यांचेस्तरावरील बैठक, चंद्रपूर महानगरपालीकेचे या ऐतिहासिक इमारतीत ‘चंद्रपूर शहर पर्यटन माहीती केंद्र’ तयार करण्यात आल्यास पर्यटन विकासात भर पडेल तसेच महानगरपालीका अंतर्गत ‘हेरीटेज समीती’ आवश्यक असुन त्वरीत घोषीत करण्याबाबत मागणी करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार आयुक्तांनाी सदर इमारतीचा नावीण्यपुर्ण मध्ये प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश संबधीताना दिले.
मागील वर्षी ‘जागतीक वारसा दिन’ 18 ंएप्रील 2018 पासुन ‘सराय स्वच्छता अभियानाची’ सुरूवात करून सलग 15 दिवस या संपुर्ण इमारतीची स्वच्छता इको-प्रोच्या सदस्यांनी केली होती. यामाध्यमाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडे मागणी करण्यात आली होती की, सदर इमारतीचे संरक्षण व संवर्धनासाठी पालिकेने पुढाकार घेउन या ऐतिहासिक ब्रिटीशकालिन वास्तुच्या इमारती मध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे ‘ऐतिहासिक चंद्रपूर शहर पर्यटन माहीती केंद्र’ तयार करण्याची मागणी केली होती.
शहरातील या ऐतिहासिक इमारतीच्या ठिकाणी असे माहीती केंद्र तयार झाल्यास चंद्रपूरात येणाÚया पर्यटकांना, नागरीकांना, विदयाथ्र्याना एकाच ठिकाणी शहरातील सर्वच ऐतिहासिक वास्तु, त्यांचे अंतर, इतिहास, कसे जावे याबाबत सविस्तर माहीती मिळु शकते. यामुळे शहरातील पर्यटन विकासाच चालना मिळेल. यासोबतच यामुळे या इमारतीचे सवर्धन सुध्दा शक्य आहे. या सराय इमारतीचे बांधकाम 1821 ते 1827 या दरम्यान पुर्ण झाले, या इमारतीचे भुमीपुजन 2 आॅक्टो 2018 रोजी संपन्न झाले होते. स्वांतत्रपुर्व काळात स्वातंत्रलढयातील अनेक पुढारी येते थांबलेले आहेत. स्वांतत्रलढयाच्या अनेक घटनांचे साक्षिदार असलेली ही इमारत आज नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. यंदा झालेल्या पावसात मागील हप्त्यात या इमारतीचा डावीकडील भागाचा छत कोसळले आहे. यावर त्वरीत निर्णय न घेण्यात आल्यास हा ऐतिहासिक वारसा कायमचा काळाच्या पडदयाआड जाईल. या इमारतीचा योग्य वापर करण्यात आल्यास ऐतिहासिक इमारतीचे संवर्धनासह शहरासाठी पर्यटनीय दृष्टया महत्वाचे केंद्र येथे तयार होऊ शकते.
चंद्र्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाच्या निमीत्ताने तत्कालीन कंेद्रीय गुह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने केंद्रीय सांस्कृतीक मंत्री, नवी दिल्ली यांचे कार्यालयात चंद्रपूर शहरातील ऐतीहासीक वास्तु संवर्धनाबाबत बैठक पार पडली होती. त्याअनुषंगाने शहरातील अन्य ऐतीहासिक वास्तु संदर्भात मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली भारतीय पुरातत्च विभागाची 27 नोव्हे 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली त्यात ‘सराय’ इमारत संवर्धनाबाबत कार्यवाही संदर्भात चर्चा झालेली होती या बैठकीच्या इतीवृत्तात नमुद आहे. तसेच वरील बैठकीत ठरल्याप्रमाणे चंद्रपूर शहर महानगरपालिकेने ‘हेरीटेज समीती’ तयार करण्यासंदर्भात चर्चा झालेली होती, त्यांनुसार सदर पत्र मा. जिल्हाधिकारी यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेला दिलेले आहे. सदर समीती सुध्दा त्वरीत तयार करण्यात आल्यास या समीतीमध्ये ‘सराय’ इमारत संवर्धनासंदर्भात योग्य तो निर्णय सुध्दा घेता येईल.