वनक्षेत्र…घनदाट वनराई… म्हणजे वन्यप्राणी यांचा अधिवास आणि त्यांचे भ्रमणमार्ग सुद्धा.. मात्र हे सर्व संकटात आहे। देशभर रस्ते विकास जोरावर आहे, आवश्यकता आहेच…या विकासकामाचे स्वागतच आहे। मात्र हे करताना वनक्षेत्रातिल महत्वाची भ्रमणमार्ग असलेल्या रस्त्यावर ‘अंडर पासेस’ (Wildlife Mitigation) तयार करण्यास हरकत नसावी। ‘वन्यप्राणी रस्ता क्रॉस करतात’ असे म्हणतात, मात्र ‘फार पूर्वी पासून नवीन रस्ते तयार झाल्याने रस्त्यानेच सलग-सलग असलेल्या ‘जंगलच क्रॉस’ केलेय…!’ आता वन्यप्राणी यांच्या हक्काचे जंगल आणि त्यांचे भ्रमणमार्ग अबाधित राहावे यासाठी मागणी करावी लागते, लढा द्यावा लागतो, हे दुर्दैव..! ही विकासकामे करताना आवश्यकता पाहुन आधीच