बुरुज क्रमांक 4 वरुन…बगड खिड़कीं यावर योगा नियमित झाल्यास, योग्य वापर होऊन कायम स्वच्छ सुद्धा राहील… या प्रकारची 39 बुरुजे या चंद्रपुर किल्ला-परकोट वर आहेत, यापैकी बरेच योग्य स्थितीत असून स्वच्छता करण्यात आलेली आहे…. आज किल्ला स्वच्छता अभियान.. सर्वाना योग दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
इको-प्रोची सोशल मीडियातून हाक, चंद्रपूरकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद… चंद्रपूरः इको-प्रोतर्फे फेसबुक-व्हॉटस्अपच्या माध्यमातून चंद्रपूर किल्ला पर्यटनासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी प्रतिसाद देत भल्या पहाटे उठून किल्ला पर्यटन- हेरीटेज वॉकमध्ये सहभाग घेतला. 17 Jun 2018. मागील 1 मार्च 2017 पासून सुरू असलेल्या चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानाला आज 446 दिवस पूर्ण झाले. किल्ला स्वच्छता अभियान सोबतच दुस-या टप्पाचे काम सुरू झाले आहे. याव्दारे चंद्रपूर किल्ला पर्यटनास चालना देण्यासाठी ‘हेरीटेज वॉक’ सारख्या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली असून, याला नागरीकांचा उत्तम प्रतीसाद मिळत आहे.
चंद्रपुर: शाशकीय रक्तपेढ़ी, सामान्य रुग्णालय मधे रक्ताचा तूटवडा निर्माण झालेला आहे. ही बाब लक्षात घेऊन आज इको-प्रो तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वर्षभरात बरीच संस्था-संघटना, राजकीय पक्ष, महाविद्यालय यांचे वतीने रक्तदान होत असते. मात्र, दरवर्षी मे-जून आणि दिवाळीच्या महिन्यात रक्तपेढ़ी मधे रक्ताचा तुटवड़ा निर्माण होन्याची समस्या निर्माण होत असते. कारण, या काळात रक्तदान शिबिर संख्या कमी असल्याने, रक्तसाठा कमी असतो. परन्तु मागणी कायम असल्याने रक्ताच्या कमतरते मुळे हा काळ शाशकीय रक्तपेढीस कठिन जातो. कारण, दर दिवशी रक्ताची गरज
वनक्षेत्र…घनदाट वनराई… म्हणजे वन्यप्राणी यांचा अधिवास आणि त्यांचे भ्रमणमार्ग सुद्धा.. मात्र हे सर्व संकटात आहे। देशभर रस्ते विकास जोरावर आहे, आवश्यकता आहेच…या विकासकामाचे स्वागतच आहे। मात्र हे करताना वनक्षेत्रातिल महत्वाची भ्रमणमार्ग असलेल्या रस्त्यावर ‘अंडर पासेस’ (Wildlife Mitigation) तयार करण्यास हरकत नसावी। ‘वन्यप्राणी रस्ता क्रॉस करतात’ असे म्हणतात, मात्र ‘फार पूर्वी पासून नवीन रस्ते तयार झाल्याने रस्त्यानेच सलग-सलग असलेल्या ‘जंगलच क्रॉस’ केलेय…!’ आता वन्यप्राणी यांच्या हक्काचे जंगल आणि त्यांचे भ्रमणमार्ग अबाधित राहावे यासाठी मागणी करावी लागते, लढा द्यावा लागतो, हे दुर्दैव..! ही विकासकामे करताना आवश्यकता पाहुन आधीच