Recent Activity

Sahbhag Sohala

पूर्वी चंद्रपुर शहराची काही गेट पुरती असलेली ओळख आता संपूर्ण परकोट आणि इतर गेट, खिडक्या आणि बुरुज करिता होऊ लागली आहे. जो वारसा चंद्रपुरकर विसरले होते तो गोंड़कालीन वारसा या स्वच्छता अभियान मुळे सर्वांच्या समोर आलेला आहे.  सतत 338 दिवस अविरत श्रमदान म्हणजे यात अभियना चे यश आहे. इको-प्रो च्या सैनिकांच्या या एनर्जी चे गुपित सर्वाना सांगितले पाहिजे जेणेकरून विविध क्षेत्रातील लोकांना यासारखे कार्य करता येईल. चंद्रपुर शहराचा चेहरा-मोहरा बदलन्यास आवश्यक ती मदत करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी सहभाग सोहळा निमित्ताने केले.

यावेळी मंचावर भारतीय पुरातत्व विभागाचे डॉ इजहार हाशमी, अधीक्षक पुरातत्वविद, नागपुर सर्किल, डॉ निखिल दास, अधीक्षक पुरातत्वविद, इको-प्रो के अध्यक्ष बंडू धोतरे उपस्थित होते. यावेळी डॉ हाशमी यांनी, चन्द्रपुर किल्ला स्वच्छता अभियान सोबत संरक्षण भिंतिचे काम सुद्धा पुरातत्व विभाग ने सुरु असल्याची माहिती दिली। या संरक्षण भिंतिचे पुढील बांधकाम आणि सौंदर्यीकरण चा प्रस्ताव सरकार कड़े पाठविन्यात आलेला होता तो मंजूर होणाच्या मार्गावर आहे. स्थानिक पातळीवर पुढील आवाहन करिता स्थानिक प्रशासनाची मदतीची आवश्यकता असल्याचे मत मांडले.

यावेळी प्रस्ताविक करताना इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी सहभाग सोहळा आयोजनाचे माहिती दिली, चंद्रपुरकर नागरिकांना किल्ला स्वच्छता पुढे संरक्षण भिंतिचे बांधकाम, संरक्षण भिंत बांधकाम दरम्यान नागरिकांचे सहकार्य, शहरातील ऐतीहासीक पर्यटन विकासाच्या दृष्टीने हेरीटेज वाॅक आयोजित करण्याची, किल्लास लागुन होत असलेला संरक्षण भिंतीचे बांधकाम नंतर आतील भागाचा वापर ‘पाथ वे’ व ‘सायकल ट्रेक’ म्हणुन विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज स्पष्ट केली, आणि अभियानबाबत सविस्तर माहिती दिली.

चंद्रपूर शहरातील ऐतीहासीक गोंडकालीन किल्ल्याचे स्वच्छता अभियान 1 मार्च 2017 पासुन सुरू करण्यात आले असुन रोज नियमित संस्थेच्या स्वंयसेवकाच्या मदतीने श्रमदानाच्या माध्यमातुन चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. आज अभियानास 338 दिवस पुर्ण झालेले आहे.

कार्यक्रम स्थळी गोंडराजांनी बांधलेला भक्कम आणी मजबुत किल्ला कसा दुरावस्थेत होता आणी स्वच्छतेनंतर यात कसा फरक पडला आहे, किल्ला स्वच्छता अभियान राबविण्यापुर्वी आणी नंतरची स्थिति दर्शविनारे फोटोग्राफ चे बैनर तयार करून प्रदर्शनी लावण्यात आलेली होती.

यावेळी सहभाग सोहळा करिता उपस्थित चंद्रपुरकर नागरिक यांनी बुरूज क्रमांक 4, 5, 6 आणी किल्लावरून चालण्याकरीता असलेल्या पादचारी मार्गावरून फिरून माहीती जाणून घेतली. हा छोटा हेरिटेज वॉक सर्वानी फिरून बघितला. या सहभाग सोहळा मधे आणि हेरिटेज वॉक मधे शहरातील गणमान्य व्यक्ति सहभागी झालेली होती. यात प्रामुख्याने अशोकसिंह ठाकुर, adv विजय मोगरे, adv अभय पाचपोर, डॉ जयंत वडतकर, अमरावती, विजय चंदावार, रमेश मुलकलवार, हरीश ससनकर, adv सिरपुरकर, डॉ देवईकर, डॉ पालीवाल, दीपक जेउरकर, सदानंद खत्री, सुरेश चोपणे, योगेश दुधपचारे, प्रा शाम धोपटे, प्रदीप अड़किने, प्रशांत आर्वे, प्रा. विजय बदखल,पो. नि प्रदीप सिरस्कार, पो नि. संपत चव्हाण, पो नि वर्षा खरसाने, मनोहर टहलियानी, सुभाष शिंदे, अनिल दहगावकार, धनंजय तावड़े, उमाकांत धांडे याशिवाय शहरातील अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संचालन प्रशांत आर्वे यांनी केले तर आभार बंडू धोतरे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संस्थेच्या सदस्यानी सहकार्य केले.