Social Issues

आपल्या जिल्हातील वन-वन्यजीव, पर्यावरणाच्या रक्षणासाठी व समाजातील विवीध समस्यांना वाचा फोडण्याकरीता इको-प्रो संस्थेने पर्यावरण व सामाजीक लोकचळवळ सुरू केलेली आहे. शहरातील तसेच जिल्हयातील विवीध समस्या ज्यामुळे सर्वसामांन्याना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. रस्त्याच्या समस्या, स्वच्छतेच्या समस्या, आरोग्याच्या समस्या, शैक्षणीक समस्या, आरोग्याच्या समस्या आदि समस्यांना वाचा फोडण्याकरीता सुध्दा इको-प्रो नागरीकांना संघटीत करून समस्या मार्गी लावण्याकरीता प्रयत्नशील आहे. सामाजीक प्रश्नांकरीता इको-प्रो ने बाबुपेठ उडड्णपुलाचा प्रश्न लावुन धरला याकरीता मोठे आंदोलन सुध्दा उभारले. प्रदुषणमुक्त चंद्रपूर व समस्यामुक्त चंद्रपूर निर्माण करण्याकरीता प्रत्येक चंद्रपूरकरांची गरज आहे, तेव्हा आपण सुध्दा या चळवळीत सहभागी व्हावे .

अ. सामाजीक समस्यांचा अभ्यास

ब. जनजागृती

क. निवेदने देणे

ड. आंदोलने