Bandu Sitarmaji Dhotre
- (Founder President : Eco-Pro, Chandrapur)
- Residence Address : Near Jod Deul, Chandrapur
- Office Address : Behind Katyayani Hospital, Near Jain Bhawan,
Pathanpura Road, Chandrapur (MS) India 442 402 - e-mail:- ecoprochd@gmail.com
- Mob. No. 093703-20746
- DoB : 09th Sep. 1979
- Education : B.A.
- Profession : wildlife & Social Activist
बंडु सितारामजी धोतरे
(संस्थापक अध्यक्ष: इको-प्रो संस्था, चंद्रपूर तथा राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी, भारत सरकार)
पत्ता
(घर) जोडदेउळ वार्ड, चंद्रपुर
(कार्यालय) :
इको-प्रो संस्था, रामाला तलाव, डॉ घाटे हॉस्पिटल जवळ, गंजवार्ड, चंद्रपुर. पिन-442402
- जन्मतारीख – 09 सप्टेबंर 1979
- शिक्षण – बी. ए.
- व्यवसाय – एल. आय. सी. एजंट
- मोबाइल: 9370320746
ई-मेल: ecoprochd@gmail.com - मिळलेले पुरस्कार
- १. राष्ट्रीय युवा पुरस्कार, भारत सरकार 2013-2014
- २. युवा प्रेरणा सन्मान, 2019
महा राज्य वन कर्मचारी संस्था, चंद्रपूर - ३. सेवार्थ सन्मान 2018
ड़ॉ गिरिधर काले, सामाजिक संस्था, बिबि, चंद्रपुर - ४. संघर्ष सन्मान 2012
डॉ अनिता अवचट फाउंडेशन, पुणे - ५. उत्कृष्ठ सामाजीक कार्यकर्ता सन्मान-2011
भारतीय मजदुर संघ, चंद्रपूर - ६. संत खराटे महाराज समाजसेवा पुरस्कार-2011
(विदर्भस्तरीय) संस्तग माउली परीवार - ७. वन्यजिव संवर्धन पुरस्कार-2010
वनराई, विदर्भ विभाग, नागपूर - ८. निसर्ग मित्र पुरस्कार-2009
केमीस्ट अॅन्ड ड्रगीस्ट असोशिएशन, चंद्रपुर - ९. जिल्हा युवा पुरस्कार-2007
नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, भारत सरकार - १०. छत्रपती शिवाजी महाराज शौर्य पुरस्कार-2006
भारतीय प्राचीन पुरातत्व संस्कृती सेवक संघ, चंद्रपुर - ११. पर्यावरणमित्र पुरस्कार-2006
पर्यावरण संर्वधन समिती, चंद्रपुर - नियुक्ती
- 1. सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ
- 2. मानद वन्यजिव रक्षक, चंद्रपूर जिल्हा
- 3. सदस्य, जिल्हा पर्यावरण समिती, चंद्रपूर
- 4. सदस्य, जिल्हा जैव-विवीधता समिती, चंद्रपूर
- 5. सदस्य, जिल्हा शांतता समिती, चंद्रपूर
- 6. सदस्य, वृक्ष प्राधीकरण, चंद्रपूर शहर महानगरपालीका, चंद्रपूर
- 7. सदस्य, डॉ शामा प्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर
- 8. सदस्य, स्थानिक सल्लागार समिती, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर
- 9. सदस्य, कार्यकारी मंडळ, वानिकी व वन्यजीव प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर वन प्रबोधिनी, चंद्रपुर
- १०. ‘स्वच्छतादूत’ स्वच्छ चंद्रपूर अभियान, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर
- 2004 पासून पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात कार्याची सुरुवात,
- 2006 मधे इको-प्रो संस्थेची स्थापना, शेकडो युवकांच्या सहभाग व कार्यातुन संस्थेची यशस्वी वाटचाल…
संस्थेस आजपर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत…
शासन-प्रशासन तर्फे जिल्हा स्तर, राज्य पुरस्कार व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. - राष्ट्रीय युवा पुरस्कार, 2018
राज्य युवा पुरस्कार, 2015
जिल्हा युवा पुरस्कार, 2007
- पर्यावरण, वन-वन्यजीव संरक्षणाकरीता आणी जिल्हयातील सामाजीक प्रश्नाकरीता केलेली आंदोलने/अन्नत्याग सत्याग्रहे
- 1. अदाणी गो बॅक आंदोलन-ताडोबा तसेच लोहारा जंगल परीसराती वन्यजिवाच्या अधिवास, वन्यप्राण्याचे संचारक्षेत्र व चंद्रपुरातील पर्यावरणास धोकादायक प्रस्तावीत कोळसा खाण प्रकल्पाविरोधात यशस्वी संघर्ष. याकरीता दोनदा “अन्नत्याग सत्याग्रह.”
1. हिवाळी अधिवेशन, नागपूर-डिसें., 2008 (8 दिवस) - 2. चंद्रपुर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 जुलै- 2 आॅग 2009 (13 दिवस)
- 3. चंद्रपुर रेल्वे स्थानकावरील मालधक्का प्रदुषण व शहरातील इतर प्रदुषणाविरोधात संघर्ष अन्नत्याग सत्याग्रह 5 डिसें-11 डिसें 2009 ( 7 दिवस)
- 3. वाघांचे प्रभावी संरक्षणाच्या मागणी करीता अन्नत्याग सत्याग्रह, जुलै 2012 (11 दिवस)
- 4. चंद्रपूर शहरातील पिण्याचा पाण्याचा संघर्ष, 2010
- 5. बाबुपेठ येथील रेलवे क्रासिंग वर उडानपुल बंधकामाच्या मागणी करिता संघर्ष, आंदोलन व अन्नत्याग सत्याग्रह, 2010
- 6. भ्रष्टाचार विरोधी आंदोलन मधे सक्रिय सहभाग, आंदोलन व अन्नत्याग सत्याग्रह, 2011
- 7. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील गांवाचे पुनवर्सन कार्यात प्रत्यक्ष सहभाग, नवेगांव व जामणी, पळसगांव या तीन गांवाचे पुनवर्सन करीता अशासकीय संस्था इको-प्रो संस्थेची मदत घेण्यात आली आहे, पुढील गांवाचे पुनवर्सन कार्य सुरू आहे.
- 8. संकटग्रस्त वन्यप्राणी रेस्क्यु आॅपरेशन एकुण 107 रेस्क्यु आॅपरेशन वाघ, बिबट, अस्वल, मगर, रानगवे आणी तृणभक्षी प्राणी
- 9. जिल्हयात मानव-वन्यजीव संघर्ष तिव्र असुन तो निवारण्याकरीता वनविभागासोबत कार्य सुरू आहे.
- 10. चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियान इको-प्रो च्या माध्यमाने 1 मार्च 2017 पासुन नियमीतपणे सुरू आहे. आज अभियानास 850 दिवस पुर्ण झाले आहेत. जवळपास 11 किमी लांब किल्लाची स्वच्छता रोज नियीमत सकाळी 6 ते 9 या वेळेत श्रमदान करून करण्यात येते. या अभियानाची दखल घेत मा. पंतप्रधान, नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या ‘मन की बात’ मध्ये इको-प्रो संस्थेचा गौरव केलेला आहे.
- 11. सर्पमित्र ते वाघमित्र असा प्रवास, पर्यावरण-प्रुदषण, आपातकालीन व्यवस्थापन, पुरातत्व संवर्धन, रक्तदान-आरोग्य, सामाजीक क्षेत्रात इको-प्रो संस्थेचे नगर संरक्षक दल, वन्यजीव संरक्षक दल तर ग्रामीण भागात ग्राम रक्षक दलाची निर्मीती करून युवकांची चळवळ सुरू आहे.
- 12. शेतकरी आणी वाघ संघर्ष टाळण्याकरीता शासनाकडे तीन वर्षापासुन पाठपुरावा व आंदोलन, शेतपीक व वन्यप्राणी संरक्षण करीता सौर उर्जा कुंपन योजना राबविण्यासाठी प्रयत्न
- 13. पर्यावरण जनजागृती करीता चंद्रपुर शहरातील शाळा-शाळांत इको-प्रो स्कुल क्लब ची निर्मीती
- 14. ‘आपला वारसा, आपण जपुया’ हा संदेश घेऊन ‘महाराष्ट्र वारसा जतन आणि संवर्धन परिक्रमा’ मोटरसायकल ने 25 सदस्य सह संपूर्म महारष्ट्रभर 4500 किमी चा प्रवास करून 30 जिल्हयात संदेश दिला
- 15. चंद्रपुर शहरात पावसाचे पाणी जल पुनर्भरण करिता ‘रेनवाटर हार्वेस्टिंग जनजागृती व संकल्प अभियान’ राबविन्यात येत आहे.