भविष्यातिल धोका ओळखून रस्ता बांधकामातील सरेखामध्ये वाढ करण्याची आयुक्तांकडे इको-प्रो ची मागणी
चंद्रपूरः चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेट ते बिनबा गेट परकोटालगत बाहेरून रस्त्याचे बांधकाम प्रगतीत आहे. सदर रस्ता हा पठाणपुरा गेट पर्यत बांधण्यात येणार आहे या रोड बांधकामाचे इको-ने स्वागत केले आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी यामुळे कमी होण्यास मदत होईल. मात्र, या रस्त्याच्या बांधकामामुळे पठाणपुरा गेट च्या अगदी बाहेर ‘अपघात प्रवण स्थळाची’ निर्मिती होण्याचा धोका लक्षात घेत चंद्रपूर शहर महानगरपालीकेचे आयुक्तांना इको-प्रोतर्फे निवेदन सादर करीत रस्ता बांधकाम सरेखा मध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे.
पठाणपुरा गेट बाहेर हनुमान मंदीर असून, हे ठिकाण अगदी पठाणपुरा गेट च्या समोर आहे. सध्या अस्तित्वात असलेला रस्ता पठाणपुरा ते नांदगाव व दुसरा पठाणुरा ते आरवट-मारडा ही दोन्ही रस्ते गेटच्या परस्पर विरूध्द दिशेकडुन गेटकडे येतात. सदर रस्ता सध्या अस्तित्वात असलेले प्र्राचीन हनुमान मंदीर आणी गेटच्या मधातुन जातो. मंदीर आणि गेट मधील अंतर फार तर 10 मिटर पेक्षा कमी असेल. सध्या या गेटच्या दोन्ही बाजुने गेटच्या आत वाहतुक सुरू आहे. वेकोली च्या रेतीची अवजड वाहतुक सुरू असते. सध्या परिस्थीतीत बरेचदा वाहतुकीची समस्या निर्माण होत असते. सदर रस्त्याचे बांधकाम झाल्यानंतर शहराबाहेर जाणा-या वाहनाची ये-जा मोठया प्रमाणात वाढेल आणी या वाहनांची गती सुध्दा अधिक असेल. शहरास बायपास करून जाणारे जड व अवजड वाहनांची वर्दळ अधिक प्रमाणात होईल. गेटच्या बाहेर या ठिकाणी चार दिशेच्या वाहनांना अगदी समोर येईस्तोवर समोरील वाहनांचा अंदाज येत नाही. सदर रस्ता बांधकाम झाल्यावर ही समस्या अधिक तिव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी अनियंत्रीत वाहनामुळे आणि समोरच्या वाहनांचा अदांज येणार नसल्याने अपघाताची तिव्र शक्यता निर्माण होईल याबाबत इको-प्रो च्या वाहतुक विभाग व आपातकालीन व्यवस्थापन विभागाने विस्तृत चर्चा केल्यानंतर इको-प्रो संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांच्या नेतृत्वात आयुक्तांची भेट घेत निवेदन देण्यात आले.
या निवेदनाची त्वरीत दखल घेत महानगरपालीकेचे आयुक्त संजय काकडे यांनी पठाणपुरा बाहेरील या परिसरास भेट देत पाहणी केली. यासंदर्भात त्वरीत उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची निर्देश संबधीत अधिकारी यांना दिले. यावेळी महानगरपालीकेचे शहर अभियंता महेश बारई, अनिल घुमडे, इको-प्रो चे बंडु धोतरे, नितीन रामटेके, अमोल उट्टलवार व स्थानीक नागरीक उपस्थित होते. यावेळी सदर अपघात प्रवण स्थळ निर्माण न होता रस्ताच्या बांधकामाच्या सरेखा मध्ये वाढ करून वळण रस्ता घेतांना प्राचीन हनुमान मंदीर परिसराच्या सौदर्यात भर पडेल या पध्दतीने नियोजन करण्याची विनंती बंडु धोतरे यांनी केलेली आहे. आयुक्तांच्या त्वरीत आणि सकारात्मक प्रतिसादाकरीता इको-प्रो च्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

No comments yet.