June 2018

You Are Here: Home / June 2018

जागतिक योग दिन…

Categories: Tags:

बुरुज क्रमांक 4 वरुन…बगड खिड़कीं

यावर योगा नियमित झाल्यास, योग्य वापर होऊन कायम स्वच्छ सुद्धा राहील…
या प्रकारची 39 बुरुजे या चंद्रपुर किल्ला-परकोट वर आहेत, यापैकी बरेच योग्य स्थितीत असून स्वच्छता करण्यात आलेली आहे….

आज किल्ला स्वच्छता अभियान..
सर्वाना योग दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

किल्ला पर्यटनाला वाढता प्रतिसाद…

Categories: Tags:

इको-प्रोची सोशल मीडियातून हाक, चंद्रपूरकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद…

चंद्रपूरः इको-प्रोतर्फे फेसबुक-व्हॉटस्अपच्या माध्यमातून चंद्रपूर किल्ला पर्यटनासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी प्रतिसाद देत भल्या पहाटे उठून
किल्ला पर्यटन- हेरीटेज वॉकमध्ये
सहभाग घेतला. 17 Jun 2018.

मागील 1 मार्च 2017 पासून सुरू असलेल्या चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानाला आज 446 दिवस पूर्ण झाले. किल्ला स्वच्छता अभियान सोबतच दुस-या टप्पाचे काम सुरू झाले आहे. याव्दारे चंद्रपूर किल्ला पर्यटनास चालना देण्यासाठी ‘हेरीटेज वॉक’ सारख्या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली असून, याला नागरीकांचा उत्तम प्रतीसाद मिळत आहे. चंद्रपूर किल्ला स्वच्छतेचे अभियान अंतीम टप्पात आलेले असताना आता इको-प्रो च्या वतीने चंद्रपूरकर नागरिकांत जनजागृती व्हावी, आपला ऐतिहासिक वारसा सुध्दा जवळून पाहावा, इतिहास जाणून घेता यावा, पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा, चंद्रपूर शहराची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे.

सोशल मीडिया फेसबुक व वॉट्सअॅप वरून या हेरीटेज वॉक साठी येण्याचे आवाहन करण्यात आले होते. विशेष की, सदर हेरीटेज वॉक मध्ये सहभागी होण्यासाठी पहाटे 5ः30 वाजता दाखल होत नागरिकांना किल्ला पर्यटनासाठी सुध्दा उत्साह दाखविला. असा प्रतीसाद म्हणजे इको-प्रोच्या मेहनतीला आलेले फळ असून, हा सहभाग संपूर्ण इको-प्रो टिमचा उत्साह वाढविणारा असल्याचे मत यावेळी इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी व्यक्त केले.

सध्या कुठलीही विशेष तयारी न करता, आहे त्या परिस्थितीत किल्ला पर्यटन सुरू करण्यात आले असून या स्थितीत सुध्दा नागरीकांच्या प्रतिक्रिया उत्साहवर्धक आहे. याकडे हवे तसे लक्ष पुरातत्व विभाग व प्रशासनाने दिल्यास किल्ला पर्यटन विकास योग्य पध्दतीने करणे सोईचे होणार आहे.
अगदी सकाळी सहभागी झालेल्या चंद्रपूरकर पर्यटक नागरीक, जेष्ठ मंडळी, लहान मुले यांना चंद्रपूरचा वैभवशाली गोंडराज्यांचा इतिहास, ऐतिहासिक वास्तुची माहिती, मंदिराची माहीती तसेच किल्लाच्या इतिहास सांगून किल्लाची दुरवस्था आणि राबविण्यात येत असलेले स्वच्छता अभियान याची माहीती सचित्र देण्यात आली. यांनतर किल्लावरून फेरफटका मारीत किल्ला आणी इतिहासाची माहीती देण्यात आली. यावेळी बुरूज 4, 5, 6, 7, 8, व 9 वरून फिरविण्यात आले. या प्रवास दरम्यान अंचलेश्वर गेट, बगड खिडकी, मसन खिडकी, गोंडराजे समाधीस्थळ व अंचलेश्वर मंदी आदी ठिकाणी माहीती देण्यात आली.

आलेल्या पर्यटक नागरिकांनी ही उत्तम संधी प्राप्त झाली असून, अनेक वास्तू आणी इतिहास कळला यापुढे होणा-या अशा उपक्रमाना अनेक नागरिकांना आम्ही सोबत घेउन येऊ असे सांगून आजच्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.

Eco-Pro Blood Donation Camp

Categories:

चंद्रपुर: शाशकीय रक्तपेढ़ी, सामान्य रुग्णालय मधे रक्ताचा तूटवडा निर्माण झालेला आहे. ही बाब लक्षात घेऊन आज इको-प्रो तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

वर्षभरात बरीच संस्था-संघटना, राजकीय पक्ष, महाविद्यालय यांचे वतीने रक्तदान होत असते. मात्र, दरवर्षी मे-जून आणि दिवाळीच्या महिन्यात रक्तपेढ़ी मधे रक्ताचा तुटवड़ा निर्माण होन्याची समस्या निर्माण होत असते. कारण, या काळात रक्तदान शिबिर संख्या कमी असल्याने, रक्तसाठा कमी असतो. परन्तु मागणी कायम असल्याने रक्ताच्या कमतरते मुळे हा काळ शाशकीय रक्तपेढीस कठिन जातो.

कारण, दर दिवशी रक्ताची गरज असतेच. सिकलसेल, थैलसीमिया, अनीमिया, टीबी रुग्ण, सामान्य रुग्णालयात प्रसूती साठी भरती असलेल्या ग्रामीण महिला, अपघात ग्रस्त रुग्ण यांना त्वरित रक्त देण्याची गरज असते. ही मागणी मोठी असते आणि या काळात रक्तदान शिबिर किंवा रक्तदाते कमी असल्याने मागणी नुसार पूर्तता करणे अडचनीचे असते. अश्यावेळी रुग्णाला रिप्लेसमेंट म्हणजे आवश्यक ग्रुप चा रक्तदाता आणावे लगते, ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णाच्या परिवारास रक्तदाता शोधणे सहज शक्य होत नाही.

वाढदिवस किंवा विशेष दिवसा निमित्त वर्षभरात अनेक शिबिरांचे आयोजन केले जाते. या दिवसांचे औचित्य आहेच मात्र, अश्या शिबिरांची खरी गरज संकटकाळात महत्वाची ठरते. चंद्रपुर शहरात बरेचदा शिबिरातुन विक्रमी रक्तदान केले जाते, इतके की संख्या हजारात असते. मात्र या विपरीत मे-जून आणि ऑक्टो-नोव्हे महिन्यात दरवर्षी रक्ताचा तुटवडा असतो. या महिन्यात सुद्धा विविध संस्था-संघटना, राजकीय पक्ष आणि महाविद्यालये यांनी वर्षात में-जून आणि दिवाळीच्या काळात सुद्धा मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची गरज असते.

आज रुग्णाची रक्ताची गरज लक्षात घेऊन इको-प्रो तर्फे शनिवार 16 जून रोजी सामान्य रुग्णालय, शाशकीय रक्तपेढ़ी मधे रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबिरातून जवळपास ३० पेक्षा अधिक रक्तदातेनी रक्तदान केले. या शिबिर मधून मिळणारे रक्त फार तर 1-2 दिवस ची गरज पूर्ण करेल, तेव्हा चंद्रपुर शहरातील सर्व संस्था-संघटनानी सुद्धा रक्तदान शिबिर चे आयोजन करून या संकटकालीन परिस्थितीत सहकार्य करण्याचे आवाहन इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले आहे.

आज झालेल्या शिबिरातून इको-प्रो चे बंडू धोतरे, योजना धोतरे, नितिन बुरडकर, रवि गुरनले, बिमल शहा, वैभव मडावी, कपिल चौधरी, हरिदास कोराम, जीतेन्द्र वालके, सावन कालीवाले, राजेश व्यास, जयेश बैनलवार, हरीश मेश्राम, सह्याद्रि प्रतिष्ठान चे दिलीप रिंगने, इरफान शेख, प्रशील ढोके, हर्षल मुठे, विशाल मराठे, संघम सेलकर, रुपेश केळझरकर, आलोक गोविदवार, सचिन सारडा, नितेश वाढई, प्रमोद गड़पल्लीवार, प्रतिक कडुकर, निखिल आक्केवार, सुमित कोहले, वनपाल किरण धानकुटे, वनरक्षक देवीदास बेरड़ आदिनी रक्तदान करून सहकार्य केले.

Mitigation News

Categories:

Wildlife Mitigation

Categories:

वनक्षेत्र…घनदाट वनराई… म्हणजे वन्यप्राणी यांचा अधिवास आणि त्यांचे भ्रमणमार्ग सुद्धा..

मात्र हे सर्व संकटात आहे।
देशभर रस्ते विकास जोरावर आहे, आवश्यकता आहेच…या विकासकामाचे स्वागतच आहे।
मात्र हे करताना वनक्षेत्रातिल महत्वाची भ्रमणमार्ग असलेल्या रस्त्यावर ‘अंडर पासेस’ (Wildlife Mitigation) तयार करण्यास हरकत नसावी।

‘वन्यप्राणी रस्ता क्रॉस करतात’ असे म्हणतात, मात्र ‘फार पूर्वी पासून नवीन रस्ते तयार झाल्याने रस्त्यानेच सलग-सलग असलेल्या ‘जंगलच क्रॉस’ केलेय…!’

आता वन्यप्राणी यांच्या हक्काचे जंगल आणि त्यांचे भ्रमणमार्ग अबाधित राहावे यासाठी मागणी करावी लागते, लढा द्यावा लागतो, हे दुर्दैव..!

ही विकासकामे करताना आवश्यकता पाहुन आधीच रोड बांधकाम अन्दाजपत्रक मधे तरतूद झाल्यास अशी संघर्ष परिस्थिती निर्माण न होता याबाबतीत ‘शाश्वत विकास’ करता येईल।